16 सप्टेंबरपासून सूर्याची शनीवर पडणारी शुभ दृष्टी; ‘या’ राशींना सुरू होतील सुखाचे दिवस.

नमस्कार मंडळी वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह  दर दिवशी वेळेनुसार संक्रमण करतात आणि इतर ग्रहांवर शुभ दृष्टी टाकतात, याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच होतो. 16 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल आणि शनीवर शुभ दृष्टी ठेवेल. अशा या ग्रहस्थितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. जाणून घेऊया, या लाभदायक राशी कोणत्या आहेत. Aaj che Aarthik Rashi Bhavishya

मीन रास (Pisces)

शनीवर सूर्याची दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. करिअरमध्ये मोठं यश मिळेल, गुंतवणुकीतून नफाही होईल, आणि देश-विदेशात प्रवासाचा योग संभवतो.

मिथुन रास (Gemini)

शनीवर सूर्याची शुभ दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रलंबित कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल, तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू लागेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती लाभेल, तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योगही येऊ शकतो.

कर्क रास (Cancer)

सूर्याची शनीवर दृष्टी तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कर्जाचे दडपण असल्यास, ते या काळात कमी होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक यश मिळतील, आणि तुमचं काम कौतुकास पात्र ठरेल. आर्थिक नफाही होईल.

 

साप्ताहिक करियर राशिभविष्य..

10 सप्टेंबर, मंगळवार  प्रीती योग आणि अनुराधा नक्षत्राचा योग जुळून येत आहे. त्याचसोबत बजरंगबली हनुमान यांच्या कृपेने कर्क आणि कुंभ यांसह 5 राशींना मोठा फायदा होईल. तुमची धनसंपत्ती वाढेल आणि व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. रखडलेले पेमेंट मिळेल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया 11 सप्टेंबरचे करिअर राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2024:

11 सप्टेंबर हा दिवस कर्क आणि कुंभसह काही राशींसाठी सर्वोत्तम ठरणार आहे. मिथुन आणि मकर राशींनी प्रत्येक काम करताना सावध राहावे, कारण चोरी किंवा अपघाताची शक्यता आहे. करिअर आणि इतर बाबतीत मेष ते मीन राशींपर्यंतच्या सर्वांसाठी राशीभविष्य काय सांगते, हे जाणून घेऊया.

मेष राशीभविष्य:
ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील. आजचा दिवस मेष राशीसाठी उत्तम आहे. तुम्ही क्रिएटिव्ह कामांमध्ये विशेष रुची घेणार आहात. मुलांच्या विवाहासाठी तारीख फायनल होऊ शकते. व्यवसायासाठीही दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करू शकता.

वृषभ राशीभविष्य:
खरेदी वाढेल आणि त्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांचे सल्ले ऐका, ते तुमच्या फायद्याचे ठरतील. ऑफिस आणि व्यवसायातील कामे मार्गी लागतील, फक्त नियोजनाची गरज आहे.

मिथुन राशीभविष्य:
सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. भागिदारीच्या व्यवसायात भागीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. कर्जाचा भार कमी होईल. मात्र, अपघात किंवा चोरीची शक्यता असल्याने प्रत्येक काम करताना सावधगिरी बाळगा.

कर्क राशीभविष्य:
रखडलेले पेमेंट मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला समाधान लाभेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. संध्याकाळी प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवाल, पण प्रवासात अडचणी येऊ शकतात.

सिंह राशीभविष्य:
सामूहिक कामांमध्ये तुमची यशस्वी भूमिका राहील. समोरच्या व्यक्तीचे विचार ओळखून कामे करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये टीमवर्कच्या माध्यमातून एखाद्या समस्येचे निराकरण करण्यास यशस्वी व्हाल.

कन्या राशीभविष्य:
मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांतपणे वागा. ऑफिसमध्ये अचानक बदल तुमच्यासाठी धक्का ठरू शकतो. महिला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे प्रोजेक्ट लवकर पूर्ण होईल.

तुळ राशीभविष्य:
कामाच्या ठिकाणी अचानक होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा विचार करा. घरातील जुनी कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे.

वृश्चिक राशीभविष्य:
ऑफिस आणि घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. व्यवसायात नवीन प्रोजेक्टची संधी मिळण्याची शक्यता आहे, फक्त कामाचे नियोजन नीट करा.

धनू राशीभविष्य:
जुनी देणी चुकती होतील, त्यामुळे तणाव कमी होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या सूचना स्विकारल्या जातील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल. खर्चावर विशेष लक्ष ठेवा.

टीप :– वरील सर्व माहिती वाचक प्रेक्षकांना माहिती पुरवणे असून यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाहीत..

Leave a Comment