कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर राहिलेले कर्ज कोण फेडणार ? काय आहे नियम जाणून घ्या सविस्तर..
संसारिक जीवनात आपली मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण बँकेतून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कर्ज घेत असतो. सामान्य नागरिकाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते कारण त्यांच्याकडे एक रकमी एवढा पैसा नसतो. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिक बँकेकडून कर्ज घेतात आज-काल ऑनलाईन कर्ज सुविधामुळे लवकर झटपट कर्ज मिळू लागले आहे.
स्वप्ने वेगवेगळ्या प्रकारची असतात काहींच्या मनात स्वतःचे चांगले घर असावे असे असते तर काहींची ड्रीम बाईक किंवा गाडी हे त्यांचे स्वप्न असते. बँका आपल्याला विविध प्रकारचे लोन उपलब्ध करून देत असतात जसे की कार लोन Car Loan, होम लोन Home loan,गोल्ड लोन Gold loan, एज्युकेशन लोन Education Loan. तसेच आज कालच्या डिजिटल युगात कॅशबॅक आणि भरमसाठ सूट यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे देखील एक प्रकारचे लोणच आहे. क्रेडिट कार्ड हे देखील एक प्रकारचे मुदतीचे कर्जाचा प्रकार आहे.
कर्ज घेण्यासाठी बँकेकडून विविध अटी घातल्या जातात त्यासाठी काही वेळेस आपल्याला आपली प्रॉपर्टी देखील गहाण ठेवावी लागते. मात्र कर्ज घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास हे कर्ज कोण भरणार ? आपण गहाण ठेवलेल्या प्रॉपर्टीचे काय होणार? याची सर्व माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.
जर मयत व्यक्तीच्या नावे होम लोन Home loan असेल तर…
जर कोणत्याही व्यक्तीने एखाद्या बँकेकडून जर होम लोन घेतले असेल तर बँक होम लोन देते वेळेस त्या घराची कागदपत्रे तारण म्हणून ठेवत असते अशा वेळेस जर नोंदवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक त्या घराचा लिलाव करून कर्जाची वसुली करते. होम लोन घेतलेल्या व्यक्तीच्या वारसदारांची ही जिम्मेदारी असते की त्यांनी कर्ज भरावे नाहीतर बँक तारण ठेवलेल्या कागदपत्राच्या आधारे संबंधित प्रॉपर्टीचा लिलाव करते आणि आपले कर्ज वसूल करते. अनेक वेळेस होम लोन घेते वेळी पती-पत्नी यांच्या नावे कर्ज असते अशा वेळेस दोघांपैकी एकाचा जय मृत्यू झाला तर दुसऱ्या अर्जदारास कर्ज भरावे लागते.
Personal loan पर्सनल लोन असल्यास काय होते..??
आज-काल सहजरित्या आणि कमी व्याजदरत पर्सनल लोन मोठ्या प्रमाणात बँका देत आहेत. सावकाराकडून किंवा खाजगी लोन हे खूप महाग असते याचा व्यासदर जास्त असतो अशा वेळेस लहान मोठ्या गरजांसाठी बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. अनेक वेळेस पर्सनल लोन घेण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण ठेवत नाही. परंतु मध्ये जर पर्सनल लोन येणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालास कुटुंबातील सदस्याची किंवा वारसदाराची लोन परतफेड करण्याची जिम्मेदारी असते. अशा वेळेस कुटुंबातील सदस्यांकडून लोन परतफेड करण्याची बँक प्रयत्न करत असते. बऱ्याच वेळेस पर्सनल लोन आहे उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून असते अशा वेळेस मृत्यू झालेला व्यक्ती जर घरातील एकमेव कमवणारा व्यक्ती असल्यास अशा वेळेस कर्जमाफ होण्याचे पुरेपूर संधी असते.
मृत झालेल्या व्यक्तीच्या नावे क्रेडिट कार्ड असल्यास..
Credit card क्रेडिट कार्ड वापरणे हे आजकाल जणू ट्रेंडच झाला आहे. ई-कॉमर्स स्टोअरवर तसेच ऑनलाईन खरेदी विक्री वेबसाईटवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते तसेच कॅशबॅक साठी क्रेडिट कार्ड प्रसिद्ध आहे. अशा वेळेस जर क्रेडिट कार्डचे बिल भरण्याअगोदर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झालास अशावेळी कर्जाची थकबाकी राईट ऑफ करते. म्हणजेच ही थकबाकी ही माप असते. जरी कुटुंबातील व्यक्तींनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केली असेल तरी देखील क्रेडिट कार्ड चे बिल हे माफ केले जाते. त्यासाठी बँक कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जिम्मेदार धरत नाही किंवा याची परतफेड करावी लागत नाही.
जर कार लोन Car Loan घेतल्यानंतर मृत्यू झाला..
सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीकडे छोट्या मोठ्या प्रकारची एक गाडी असते. आपल्या स्वप्नातील गाडी घेण्यासाठी अनेक वेळा आपण हप्त्यावर किंवा कर्ज काढून गाडी घेत असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या नावे कार लोन असेल आणि अशा संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांची किंवा कुटुंबातील सदस्यांची कर्ज परतफेड करण्याची जिम्मेदारी असते. अशा वेळेस कुटुंबातील व्यक्ती किंवा इतर सदस्यांकडून कर्जाची पूर्तता न झाल्यास बँके कडून गाडी जप्त केली जाते आणि त्याचा लिलाव करून पैशांची वसुली केली जाते. Car Loan.
खाजगी कर्जाच्या बाबतीत देखील असेच असते अनेक वेळा काहीतरी गहाण ठेवून कर्ज दिले जाते. तर काही वेळेस काहीच तारण न ठेवता कर्ज दिले जाते अशा वेळेस तारण ठेवले असल्यास दिलेली तारण ठेवलेली मालमत्ता जप्त केली जाते परंतु तारण नसल्यास हे कर्ज बुडाल्यात जमा असते..