Kapus Soybean Anudan List कापूस सोयाबीन अनुदान 10 सप्टेंबर पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात ; येथे पहा यादीत नाव तुम्हाला मिळणार की नाही…

Kapus Soybean Anudan List  शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या पहिले कापूस व सोयाबीन अनुदान जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार 194.68 कोटी रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी तांत्रिक अडचणीचे निवारण करून 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आदेश महाआयटी आणि महसूल विभागाला दिले आहेत. हे 10,000 हजार रुपये अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 

2023-24 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.. या बैठकीत कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांचे एकूण क्षेत्र दोन हेक्टर पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना  सरसकट 1000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

या अनुदानामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548.34 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646.34 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

याबाबतीत सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शेतकरी माहितीस्तव तो पाही पाहू शकतात. शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरात लवकर जमा करण्याचे सरकार मार्फत सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती यावेळी दिली. हंगाम 2023 च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अर्थसहाय्याची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केली आहे.

कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला येणार की नाही यादीमध्ये नाव कसे तपासायचे…

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाची स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा :

1. वेबसाइट ओपन करा [सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट](https://scagridbt.mahait.org/) वर जा.

2. “Disbursement Status” वर क्लिक करा: वेबसाईटवर उघडल्यावर “Disbursement Status” हा पर्याय निवडा.

3. आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा: आपला आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा दाखवलेले प्रमाण भरा.

4. ओटीपी भरून सबमिट करा: आपल्या आधार क्रमांकाशी संबंधित मोबाईलवर आलेला ओटीपी (One Time Password) भरा आणि सबमिट करा.

5.  सबमिट केल्यानंतर आपल्याला आपले स्टेटस दिसेल. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत असेल, त्यांना त्यांच्या बँक खात्यात लवकरच पाच हजार रुपये जमा होणार आहेत.

जर काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्ही ओटीपी टाकून देखील यादी ओपन होत नसल्यास काही काळजी करू नका. ज्या शेतकरी बांधवांना त्यांचा आधार ओटीपी आला आहे अशा शेतकरी बांधवांना अनुदान येणार आहे त्यांचे यादीमध्ये नाव आहे. 

ज्या शेतकरी बांधवांना आधार नंबर टाकून देखील ओटीपी येत नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी समजून जावे की तुमचे यादीमध्ये नाव नाही तुम्हाला अनुदान येणार नाही..

कापूस सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी काय करावे..??

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आणि बाजारपेठेतील घसरणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

दुष्काळामुळे पिकांच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात घट झाली आणि कर्जबाजारीपणाचे संकट निर्माण झाले.

हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संमती पत्रासोबत एक अर्ज नमुना भरून आपल्या संबंधित तलाठी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. ई-पिक पाणी पोर्टलवर आपल्या कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद केलेले शेतकरी या अनुदानासाठी पात्र असतील. ऑनलाइन नोंद केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे खाते आधार लिंक केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे.

अर्ज नमुना भरून आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहाय्यकाकडे जमा करावा. अर्ज नमुना.

यावर्षी हवामान बदलामुळे आणि कमी पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. राज्य सरकारने कर्जमाफी, अनुदान आणि सिंचन सुविधा यांसारख्या विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरवले आहे.

Leave a Comment