Land E Mojani : जमीन मोजणीचे वाद आता कायमचे मिटणार; उपग्रहाद्वारे होणार जमिनीची मोजणी.. ऑनलाईन करता येणार अर्ज !!

Land E Mojani ‘ई मोजणी व्हर्जन २.०’ ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेली एक डिजिटल प्रणाली आहे, जी शेतजमिनींची मोजणी करण्यासाठी (लँड सर्व्हे) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. या प्रणालीद्वारे, जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित, आणि पारदर्शक करण्यात आली आहे.

Land E Mojani ऑनलाइन प्रणाली काय आहे..

Land E Mojani: जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करणे आणि शुल्क भरणे यासह दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ‘इ मोजणी व्हर्जन २.०’ (E Mojani 2.0) ही अद्ययावत संगणकप्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.

E Mojani: जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी या प्रणालीचा वापर नंदुरबार (Nandurbar) व वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांत जमिनीची मोजणी वेळेवर होत नसल्यामुळे अनेक जमिनी वादात अडकल्या असून, पडीक पडल्या आहेत. शेतीपेक्षा शेतकऱ्यांना भाऊबंदकीमध्ये बांध आणि दगडावर अधिक लक्ष असते. त्यामुळे अशी अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित पडलेली आहेत. अशी प्रकरणे तातडीने मोजणी झाली तर न्यायालयातील जमिनीबाबतची अनेक प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे.

या मोजणीतून जमिनीची हद्दकायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्ट वाटप, कोर्टकमिशन व विविध प्रकल्पाकरिता भूमी संपादन, आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. दाखल होणाऱ्या मोजणी अर्जातील जमिनीची मोजणी जीआयएस आधारित रोव्हर्सवर करण्यात येईल. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक जमिनीच्या हद्दीच्या अक्षांश व रेखांश याची माहिती प्राप्त होईल.

Land E Mojani परिणामी जमीन मोजणी प्रकरणात मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका अथवा दोन मोजणीमध्ये हद्दीत अंतर पडण्यासारखे वाद अथवा तक्रारी कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. संपूर्ण राज्यात लागू वर्षभरापूर्वी या प्रणालीचा वापर करण्यास सुरवात झाली असून नंदुरबार व वाशिम जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यात ही प्रणाली लागू करण्यात आली होती.

त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्हे, तालुक्यात ती लागू करण्यात आली असून, आता संपूर्ण राज्यात ही संगणक प्रणाली लागू करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाने काढला आहे.

PM Kisan Yojana instalment :- पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!!

ई-मोजणीचे असे असणार फायदे… Land E Mojani

  • जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार.
  • मोजणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा.
  • अर्जाची सद्यःस्थिती एसएमएसने समजणार.
  • जमीन मोजणी प्रत ऑनलाइन मिळणार.
  • मोजणीच्या नकाशावर अक्षांश, रेखांशाची माहिती असणार.
  • जमिनीचे लोकेशन कळणार.

 

Land E Mojani : ई मोजणी व्हर्जन २.० च्या काही मुख्य वैशिष्ट्ये:

1. उच्च तंत्रज्ञान वापर: ड्रोन, GNSS (Global Navigation Satellite System) आणि GIS (Geographic Information System) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी केली जाते. यामुळे अधिक अचूक मोजणी होते.

 

2. डिजिटल नकाशे: मोजणीसाठी तयार केलेले नकाशे डिजिटल स्वरूपात असतात, जे शेतकरी, जमीन मालक आणि इतर संबंधित पक्षांना सहज उपलब्ध होतात.

 

3. पारदर्शकता आणि कार्यक्षमता: पूर्वी मोजणीची प्रक्रिया जटिल होती आणि वेळखाऊ ठरत होती. ई मोजणीमुळे प्रक्रिया पारदर्शक झाली आहे, आणि शेतकऱ्यांना ऑनलाइन त्यांच्या जमिनीबद्दल माहिती मिळते.

 

4. ऑनलाइन सेवा: शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून मोजणीची विनंती करता येते. तसेच, मोजणी झाल्यानंतर त्यांना सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाते.

 

5. रीअल टाइम डेटा: मोजणीचे रिझल्ट्स रिअल टाइममध्ये अपडेट केले जातात, ज्यामुळे जमिनीच्या माहितीमध्ये कोणताही दुरावस्था होण्याची शक्यता राहत नाही.

ई मोजणी व्हर्जन २.० मुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीबाबत अधिक सहजता मिळाली आहे, आणि यामुळे जमिनीचे मोजणीचे वाद किंवा समस्या कमी होण्याची शक्यता आहे. Land E Mojani

DA increase news 01 ऑक्टोबर पासून महागाई भत्यात होणार एवढी वाढ, इतक्या हजारांनी वाढणार पगार

Leave a Comment