या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 18व्या हप्त्याचे 4,000 हजार रुपये ; पहा तुमचे तर नाव नाही ना यादीमध्ये..

केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी शेतीच्या कामासाठी आर्थिक सहाय्य म्हणून 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. परंतु अनेक शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे दाखल करून बोगसगिरी करत आहेत. बोगस लाभार्थ्यांचे  प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे.

अनेक वेळा सर्व्हर डाउन होण्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही. ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे आले नाहीत, या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे. ज्यामुळे तुम्हाला देखील  मागील हप्त्याची रक्कम मिळाली नाही. आपल्याला PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलेली नाही, तर लवकरात लवकर ती पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्त्याची अडचण होऊ शकते. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून ई केवायसी प्रक्रियेसह अजून कोणत्या गोष्टी बंधनकारक करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती घेऊया आणि तुम्हाला मागील हप्त्याचे पैसे न येण्याचे कारण सविस्तरपणे जाणून घेऊया..

ई-केवायसी पूर्ण झाल्याची स्थिती कशी तपासावी:

1. पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: (http://pmkisan.gov.in).
2. मुख्यपृष्ठावर “लाभार्थी स्थिती” हा पर्याय निवडा.
3. “Get Data” वर क्लिक करा आणि तुमची स्थिती तपासा.

महाराष्ट्र राज्यात अजूनही जवळपास 20 लाख शेतकरी बांधवांची ही केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी 18 व्या हप्चे 2000 देखील या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शेतकरी बांधवांची ही केवायसी प्रक्रिया लँड शेडिंग तसेच आधार बँक खाते जोडणी प्रक्रिया अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना अडचण येऊ शकते..

Pm Kisan योजने मधून खालील लोकांना मिळणार नाहीत 6000 रुपये..

1. पती-पत्नी यापैकी एकालाच योजनेचा लाभ घेता येतो.
2. जर शेतजमीन शेती व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरली जात असेल, तर लाभार्थ्याचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
3. ई-केवायसी पूर्ण न करणारे शेतकरी योजनेतून वगळले जाऊ शकतात.
4. जर जमिन भाड्याने देण्यात आलेली असेल, तर त्यालाही लाभ मिळणार नाही.
5. आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे वेळेत हे काम पूर्ण करा. .

 

PM किसान योजनेतील ‘लँड सीडिंग’ म्हणजे काय?

 

PM किसान योजनेत ‘लँड सीडिंग’ हा एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती सुसंगत आणि अद्ययावत ठेवणे आहे. यामध्ये जमिनीच्या तपशीलांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते, जी योजना व्यवस्थापनासाठी आणि लाभार्थींच्या यादीच्या सत्यापनासाठी महत्त्वाची आहे.

लँड सीडिंगचे महत्त्व:

 

1. सत्यापन: यामुळे शेतकरी खरा आहे की खोटा याची माहिती सरकारला कळते आणि बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी होते. यामुळे योग्य शेतकऱ्यांना याचा फायदा होतो.

2. पैशांचे सुलभ वितरण: जमिनीच्या डिजिटल रेकॉर्ड मुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांची माहिती सरकारपर्यंत अचूक पोहोचते ज्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होण्यास अडचण येत नाही.

4. आर्थिक योजना: शेतकऱ्यांच्या जमिनीच्या माहितीचा आधार घेतल्याने योजना व्यवस्थापन सुधारते आणि वित्तीय सहाय्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनते.

लँड सीडिंग प्रक्रिया कशी पूर्ण करावी:

 

1. माझ्या जमिनीचा तपशील तपासा: PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि तुमची जमिनीची माहिती तपासा.

2. अद्ययावत माहिती देणे: जर जमिनीची माहिती अपडेट करणे आवश्यक असेल, तर संबंधित विभागाकडून किंवा स्थानिक महसूल अधिकारी कडून सहाय्य घ्या.

पीएम किसान योजनेचा फायदा न मिळण्याचे कारणे:

1. ई-केवायसी न पूर्ण करणे: योजना अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक आहे. जर शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला पूर्ण केलेले नाही, तर त्यांना निधीचा लाभ मिळणार नाही.

2. लँड सीडिंग अद्ययावत न करणे: शेतकऱ्यांच्या जमिनीच्या माहितीचा अद्ययावत नोंद न झाल्यामुळे किंवा चुकीच्या तपशीलांमुळे निधीचे वितरण अडचणींना सामोरे जाऊ शकते.

3. बोगस लाभार्थी: जर शेतकरी योजनेच्या अटी पूर्ण करत नाहीत किंवा बोगस लाभार्थी म्हणून नोंदले गेले असतील, तर त्यांना लाभ मिळवता येत नाही.

4. आयडी नोंदणी आणि कागदपत्रांची अडचण : काही वेळा शेतकऱ्यांची आधार कार्ड, बँक खाते किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असू शकतात.

5. अधिकृत माहिती अद्ययावत न करणे: शेतकऱ्यांनी पत्त्याचा बदल, बँक खात्याचा बदल किंवा इतर बदलाची माहिती संबंधित विभागाला न दिल्यास, निधी वितरणात अडचण येऊ शकते.

6. कृषी जमीन भाड्याने दिली असल्यास: पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे शेत जमीन ही शेतकरी स्वतः पिकवत असावा त्याने उद्योगधंद्यासाठी किंवा इतर कारणासाठी आपली जमीन भाड्याने दिलेली नसावी. तसेच भाड्याने इतर शेतकऱ्यांची जमीन कसणारे शेतकरी देखील यासाठी पात्र नाहीत.

7. तपासणी प्रक्रियेतील अडचणी: योजनेच्या तपासणी प्रक्रियेत काही तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळण्यास विलंब होऊ शकतो.

आगामी हप्ता येण्यासाठी काय करावे..??

– ई-केवायसी पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट करा.
– लँड सीडिंगची माहिती तपासा आणि योग्यरित्या अद्ययावत करा.
– योजनेच्या अटी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करा.
– स्थानिक प्रशासन किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तपासणी करा.

या मुद्द्यांवर लक्ष देऊन, शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यास मदत होईल.

Leave a Comment