Yojana Doot Bharti Form 50 हजार “योजना दूत” भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू.. असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य सरकारने होतकरू उमेदवारांसाठी एक मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. “योजना दूत भरती” योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी योजना राज्यातील गोरगरीब नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि  योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 50,000 योजना दूतांची भरती केली जाणार आहे.

काय आहे “योजना दूत”..?

या भरती अंतर्गत भरती केलेल्या योजना  दूतांना राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजना त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम देण्यात येणार आहे. यासाठी योजना दूताना आपल्या गावातच काम मिळणार आहे त्यामुळे इतर गावात जायची गरज लागणार नाही.या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि त्यांना प्रति महिना 10,000 रुपये वेतन दिले जाईल.

मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राज्य सरकारने सुरु केला असून त्याअंतर्गत तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या योजनादूतांना सरकारच्या योजनांची माहिती सामान्य लोकांना देण्याची जबाबदारी असणार आहे. निवड झाल्यावर सहा महिन्यांसाठी यांना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. राज्यभरातून ५०,००० योजना दूतांची निवड केली जाईल आणि यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

“योजना दूत” भरतीचा  अर्ज कसा करायचा यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा :

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:  सर्वप्रथम, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. संबंधित लिंक खाली दिलेली आहे.

2. नोंदणी करा: वेबसाइटवर नोंदणीसाठीचा फॉर्म भरा. आवश्यक माहिती, जसे की नाव, संपर्क तपशील, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती भरावी.

3. माहिती व दस्तऐवज जमा करा: अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

4. अर्ज सबमिट करा: योग्य ती माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र जोडा आणि आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट करा.

5. तपासणी आणि मुलाखत: अर्जाची तपासणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत किंवा पुढील प्रक्रिया होईल.

6. निवड: अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर निवड झालेला उमेदवार “योजना दूत” म्हणून काम करेल आणि त्याला कामाचे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाईल.

लक्षात ठेवा: अर्ज करताना शासकीय सूचनांचे आणि वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

निवड प्रक्रिया, निकष आणि फायदे:

– इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे. अर्ज https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर करावा लागेल.

यासाठी कोण अर्ज करू शकते :-

– वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्ष
– शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर
– संगणक ज्ञान आवश्यक
– अद्ययावत मोबाईल असावा
– महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– आधार कार्ड आणि त्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे

अर्ज नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे:

1. योजना दूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
2. तुमचा योग्य तो आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि OTP पाठवलेल्या नोंदणीकृत फोनची पडताळणी करा.

योजना दूत बनल्यास इतर काही फायदे

– प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे
– दलाचा भाग होण्याची संधी
– विद्यावेतनातून आर्थिक साहाय्य
– शिकण्याबरोबर कौशल्य विकास
– सरकारी कामकाजाचा अनुभव मिळवणे

योजना दूतांसाठी आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड
2. पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
3. अधिवास प्रमाणपत्र
4. बँक पासबुक
5. पासपोर्ट साईज फोटो
6. हमीपत्र

योजना दूतांची कामे:

1. योजना माहिती संकलन: योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती मिळवतील.
2. नेमणुकीचे कार्य: दिलेल्या ठिकाणी जाऊन सरकारने ठरवून दिलेले कामे पार पाडणे बंधनकारक असेल.
3. योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी:  राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करून ग्राम पातळीवरील यंत्रणेशी समन्वय साधून शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील.
4. अहवाल सादर: दर दिवशी त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करून ऑनलाइन अपलोड करतील.
5. चांगले वर्तन:  योजना दूतांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांचा गैरवापर किंवा नियमबाह्य कामे करणे टाळावे. गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्तन करणे स्वीकारले जाणार नाही आणि असे झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.

Leave a Comment