महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा
Crop insurance दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा होणार.. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी जाहीर केले आहे की, पिक विमा कंपन्यांनी राज्यातील 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना बांधवांना 1700 कोटी रुपये पिक विमा अग्रीम देण्याचे मंजूर केले आहे. ही अग्रीम पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना दिवाळी सणाच्या अगोदर त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. अतिवृष्टी आणि पावसामुळे झालेल्या सोयाबीन आणि कापूस तसेच इतर मुख्य पिकांच्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी गोड भेट देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. या पेआउटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध पिके आणि भाग समाविष्ट आहेत.
आगाऊ पीक विमा पेआउट तपशील
दिलेल्या माहितीनुसार:
– हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण 35 लाख 8 हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात आगाऊ पिक विमा रक्कम प्राप्त झाली आहे.
– एकूण वाटली जाणारी रक्कम ही 1700 कोटी 73 लाख रुपये ही रक्कम दिवाळी दिवाळीच्या अगोदर टप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित केली जाणार आहे.
-यातील कांदा सोयाबीन अशा काही पिकांची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
आगाऊ पेआउटचे जिल्हानिहाय विभाजन
आगाऊ पीक विमा पेआउटचे तपशीलवार जिल्हानिहाय विभाजन पुढीलप्रमाणे आहे:
– नाशिक: 3,50,000 शेतकरी, रु. 155.74 कोटी
– बीड: 7,70,574 शेतकरी, रु. 241.21 कोटी
– बुलढाणा: 36,358 शेतकरी, रु. 18.39 कोटी
– जळगाव: 16,921 शेतकरी, रु. 4.88 कोटी
– अहमदनगर: 2,31,831 शेतकरी, रु. 160.28 कोटी
– सोलापूर: 1,82,534 शेतकरी, रु. 111.41 कोटी
– सातारा: 40,406 शेतकरी, रु. 6.74 कोटी
– सांगली: 98,372 शेतकरी, रु. 22.04 कोटी
– धुळे: 4,98,720 शेतकरी, रु. 218.85 कोटी
– अकोला: 1,77,253 शेतकरी, रु. 97.29 कोटी
– कोल्हापूर: 228 शेतकरी, रु. 0.13 कोटी
– जालना: 3,70,625 शेतकरी, रु. 160.48 कोटी
– परभणी: 4,41,970 शेतकरी, रु. 206.11 कोटी
– नागपूर: 63,422 शेतकरी, रु. 52.21 कोटी
– लातूर: 2,19,535 शेतकरी, रु. 244.87 कोटी
– अमरावती: 10,265 शेतकरी, रु. 0.08 कोटी
अग्रीम पिक विमा कधी जमा होणार..
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. याबाबत शेतकरी बांधवांचा डाटा संकलन करणे चालू आहे हे काम झपाट्याने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः दिवाळीच्या हंगामापूर्वी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे.
सोयाबीन कापूस अनुदान देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात.
सोयाबीन आणि कापूस या महाराष्ट्रातील मुख्य पिकावर गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने घाला घातला आहे. ऐन काढणीच्या वेळी सोयाबीन पीक पावसात भिजते यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच कापसाच्या बाबतीत देखील झाले आहे ऐन दिवाळीच्या वेळेस पाऊस आल्यामुळे कापूस भिजून काळा पडत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना चांगला बाजार भाव देखील मिळत नाही हाताशी आलेले पीक निसर्ग हिरावून घेत असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे याचा अधिकृत जीआर देखील शासनाने निर्गमित केला असून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा करण्यात येणार आहे. अधिकृत शासन निर्णय येथे पहा
पिक विम्याचे महत्त्व..
शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्ती दुष्काळ महापौर नापी क अशा अनेक समस्या मधून सावरण्यासाठी पिक विमा एक महत्वपूर्ण संरक्षण आहे. पिक विमा मुळे कृषी क्षेत्रातील अनिश्चित उत्पादन क्षमता यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य मिळते. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण म्हणून शेतकरी बांधवांनी वेळेत पिक विमा काढला पाहिजे. जो की शेतकरी बांधवांना अडचणीच्या काळात उपयोगी येईल.
दिवाळी सारख्या महत्त्वपूर्ण सणाच्या वेळी आगाऊ पैसे मिळणे हे शेतकरी बांधवांसाठी एक भेटच आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल आणि आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. महाराष्ट्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या या उपक्रमाचे शेतकरी वर्गाकडून कौतुक होईल.