Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक लोकप्रिय योजना आहे. राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत, आणि त्यातल्या बऱ्याच महिलांना 4500 रुपये देखील मिळाले आहे. आता, योजनेसाठी नवीन फॉर्म उपलब्ध झाला आहे आणि अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र नवीन अपडेट शासन निर्णयानुसार आता लाडक्या बहिणीचे फॉर्म फक्त अंगणवाडी मध्येच भरले जाणार असल्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यावा नाहीतर तुम्हाला या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.

नवीन अर्ज कसा भराल?

तथापि, नवीन शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका वगळता इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नवीन अर्ज भरणे आता सोपे झाले असून अर्ज भरल्यानंतर महिलांच्या खात्यात डायरेक्ट 4500 हजार रुपये जमा होणार आहेत. अर्जदार भगिनींनी योग्य ती माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा.आता तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी नवीन अर्ज भरणे सोपे झाले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: अर्ज भरण्याची लागणारे कागदपत्रं आणि माहिती..

 

1. तुमची वैयक्तिक माहिती भरा:
– महिलेचं संपूर्ण नाव: इंग्रजीत टाईप करा.
– वडिलांचे नाव: कॉलममध्ये लिहा.
– पतीचे नाव: विवाहित असल्यास पतीचे नाव भरा.
– लग्नापूर्वीचे नाव: इंग्रजीत भरा.
– वैवाहिक स्थिती: योग्य पर्याय निवडा.
– जन्मतारख: आधारकार्डप्रमाणे भरा.
– जन्मस्थान: महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर “होय”वर क्लिक करा. अन्यथा, जन्मलेल्या राज्याचा पर्याय निवडा आणि संबंधित कागदपत्र अपलोड करा.
– पत्ता: आधारकार्डप्रमाणे पत्ता भरा.
– पिनकोड: भरा.
– स्थानिक माहिती: जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका, मतदारसंघ निवडा.
– मोबाईल क्रमांक: अधिकृत मोबाईल क्रमांक भरा.

2. बँक खाते माहिती:
– आधारकार्डशी लिंक असलेल्या बँकेचा खाते क्रमांक भरा.
– बँक संबंधित माहिती भरा, आयएफएससी कोड भरा.
– बँक खाते आधारकार्डशी लिंक असेल तर “होय”वर क्लिक करा. नसेल तर खाते लिंक करून घ्या.
– कागदपत्रे अपलोड करा: आधारकार्डच्या समोरील बाजूची फोटो अपलोड करा आणि मागील बाजूची फोटो अपलोड करा.

3. अन्य कागदपत्रे:
– केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड: संबंधित पर्याय निवडा आणि रेशनकार्डाची पहिली व दुसरी बाजू अपलोड करा. रेशनकार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करा.
– अधिवास प्रमाणपत्र: तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करा.
– अर्जदाराचे हमीपत्र: डाउनलोड करून भरून अपलोड करा. हमीपत्राच्या सर्व पर्यायावर टिक मार्क करा आणि सही करा.
– बँक पासबुक आणि फोटो: अपलोड करा.

अर्ज भरण्यासाठी भगिनींनी राशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, आधार कार्ड यांचे झेरॉक्स जोडून द्यावेत. चुकीची माहिती दिल्यास ही शेवटची संधी आहे यानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे अर्ज भरताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

अचूक आणि व्यवस्थित फॉर्म भरल्यास, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्जात कोणतीही अडचण आली नाही तर तुमचं अर्ज प्रक्रियेतून पार होईल.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास दि. ०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दि. १२.०७.२०२४ व दि. २५.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्वीकृतीचे अधिकार देण्यात आले होते.

Leave a Comment